उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची होणार आधार नोंदणी

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 8 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राज्यातील इयत्ता बारावी, उच्चशिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनांसाठी आधार क्रमांकाची नोंदणी आणि प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित विभागातील, अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये, विद्यापीठांनी उच्च व्यावसायिक व बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची आधार नोंदणी तातडीने करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा, अश्या विषयाचे पत्र पुणे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठांच्या कुलसचिवांना पाठविले आहे. 

इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्याथ्यांची आधार नोंदणी आणि प्रमाणीकरण शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने केले आहे. शिष्यवृत्तीच्या विविध योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी आधार नोंद करणे आवश्यक आहे, असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या निदर्शनास आले आहे.

वैद्यकीय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उच्चशिक्षण संचालनालयातर्फे उच्य व्यावसायिक व बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणान्या अल्पसंख्याक विद्याथ्यर्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करावी, अशा सूचना राज्य शासनाने वैद्यकीय, तंत्रशिक्षण आणि उच्चशिक्षण संचालकांना दिल्या आहेत.